मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

चोपडायन

#चोपडायन १

एका विमानाचे टेक ऑफ सुरू आहे, फरहान त्याच विमानात आहे. सगळ्यांना फोन वगैरे बंद करायच्या सूचना आलेल्या असतात, आणि नेमका फरहान चा फोन वाजतो. बिझिनेस क्लास मध्ये असल्याकारणाने सगळ्यांनी त्रासिक चेहऱ्याने निषेध नोंदविला. दोनदा फोन वाजल्यावर फरहान ने फोन उचलला, आणि तिकडून आवाज आला "बे भैताडा रंचो सापडला"......
फरहान म्हणाला "च्या मारी पनवती लागली, कुठाय रे तो ??" तेवढ्यात एक हवाइसुंदरी त्याला फोन बंद करा म्हणून मागे लागली... फरहान ला नाइलाजाने फोन बंद करावा लागला, पण त्याच्या छातीत एक जोरात कळ आली आणि तो कोसळला...
जेव्हा त्याने डोळे उघडले, तेव्हा तो एका व्हीलचेअर वर होता आणि आजूबाजूला डॉक्टर होते. त्याचा प्लॅन यशस्वी झाला होता, इमर्जन्सी लँडिंग करून त्याला विमानाच्या बाहेर काढले होते.
तो तसाच उठला आणि दोन चार उड्या मारून डॉक्टर ला म्हणाला मी ठीक आहे. जवळ जवळ पळतच बाहेर आला आणि एका कुना व्यक्तीला न्यायला आलेल्या ड्रायवर ला म्हणाला चल. तो पण सदर व्यक्ती तीच आहे म्हणून चालू लागला, तोवर फरहान ने राजुला फोन लावला..
राजू आपल्या अंथरुणात झोपा काढत होता, त्याची पत्नी रामदेव बाबा चा योगा करत होती..ह्याने झोपेत फोन उचलला आणि जोरात ओरडला काय ?????
झाले एवढ्या मोठ्या आवाजाने त्याची पत्नी योगामधून कोमा मध्ये जायची बाकी राहिली होती..

इकडे मुन्नाभाई रेडिओ वर त्याच्या आवडत्या मुलीचा शो ऐकत बसला होता, मस्त आवाज होता मुलीचा..
तेवढ्यात त्याचा फोन वाजला, त्याने फोनवर जे ऐकले आणि खुशीत रेडिओ ला एक ठोसा लगावला..बिचाऱ्या त्या रेडिओतील मुलीचा आवाज अक्षरशः रेडी (आमच्या गावी म्हशीच्या बाळाला रेडी म्हणतात) सारखा यायला लागला..आणि मुन्नाभाई ने जोरात आवाज दिला "ए सर्किट, चल बे गाडी काढ लवकर"....

फरहान ने राजस्थान ला एक फोन लावला आणि तिकडून एक छान सा आवाज आला "मी द्रोणा ची सावली बोलतेय" हा इकडून ओरडला त्या बेवड्याला फोन दे म्हणावं फरहान चा फोन आहे..च्यायला हि काय झोपायची वेळ आहे का ??
तिकडून द्रोणा हॅलो म्हणाला आणि त्यानेही जे ऐकले आणि पूर्ण रात्रीची नशा उतरली...
त्याने सावली ला सांगितलं तयारी करा मला जायचं आहे आणि अजून एक कृपा करून तो घोडा नको तयार करू विमानाचं तिकीट काढ...
आता शेवटचा फोन म्हणून त्याने कॉलेज च्या प्रिन्सिपॉल ला फोन केला आणि सर्व सांगितलं.. झालं जुन्या आठवणी ने प्रिन्सिपॉल ला चक्कर आली आणि तो भर वर्गात पडला..

जवळपास सर्वाना फोन केल्यावर फरहान त्या जागेवर आला जिथे त्याला सायलेन्सर ने बोलावलं होतं.

क्रमशः
© नितीन बबन शेंडगे